राज्यमंत्री बच्युभाऊ कडू यांचे वाढदिवसा निमित्त उंबरे येथील कार्यकर्त्यांनी आपल्याच गावातील निराधार कुटुंबाला दिला आधार,* *कोरोनामुळे बापावाचुन पोरक्या झालेल्या लेकीचा शिक्षनापासुन ते लग्नापर्यतचा खर्च उचलण्याची घेतली जबाबदारी,*

पंढरपूर:प्रतिनिधी
कोरोना सारख्या महामारीने जगाला हैराण केले आहे ह्या महामारीमधे शेतकरी कष्टकरी मजुर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करत आहेत..कोरोना महामारीने अनेक घरातील कर्ते पुरुष गेल्याने लहान लहान लेकरे पोरकी झाली संसार उघड्यावर आले,आता ह्यामधे गरज आहे एकमेकांना आधार देण्याची. हे लक्षात घेऊन
कोरोनासारख्या राक्षसाने उंबरे (पागे)गावातील कुटुंबातील कर्ता पुरुष हीराऊन घेतल्याने कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला असताना आज बच्युभाऊ कडू यांच्या वाढदीवसाचे औचित्य साधुन ,आज पंढरपुर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे यांनी ह्या दुखाःतुन सावरत असलेल्या कुटुंबाला सांत्वरपर भेट दिली..
कुटुंबातील मुलांना खाऊ घेण्यासाठी 1000रुपये आणि 1क्विंटल धान्य मदत म्हनुन देण्यात आले तसेच त्या कुटुंबातील एका मुलीचा शिक्षना चा संपुर्ण खर्च आणि त्या मुलीचा लग्नाचा सुधा खर्च उचलण्याचा शब्द नानासाहेब इंगळे यांनी दीला., कोणतेही अडचणआली तरी तुमचा भाऊ मामा ह्याच नात्याने मला हाक मारा मी कायम तुमच्या सोबत आहे असा विश्वास नानासाहेब इंगळे यांनी निराधार झालेल्या कुटुंबाला दीला..
उंबरे गावात इतरही गरीब कुटुंबाना प्रत्यकी 10कीलो धान्य वाटप करण्याचा निर्धार ह्यावेळी केला..
यावेळी
प्रहारचा बुलंद आवाज बापु मोहीते,आबा सलगर, दीपक ढोबळे,विठ्ठलराजे कानगुडे ,भारत कानगुडे ,अक्षय क्रुपाळ उपस्थित होते..